माढा

सकल मराठा समाजाच्या वतीने अंजनगाव खेलोबा येथे रास्ता रोको आंदोलन तहसीलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सकल मराठा समाजाच्या वतीने अंजनगाव खेलोबा येथे रास्ता रोको आंदोलन

तहसीलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले निवेदन

माढा (प्रतिनिधी) – माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे सकल मराठा समाज व समस्थ गावाकऱ्यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

गावातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेऊन या आंदोलनास पाठिंबा दर्शवला.गावातील इतर समाज बांधव व सामाजिक संघटनांनी ही या आंदोलनात सहभाग घेतला होता.

पोलीस प्रशासनाने निवेदन आपल्या कडे देण्यास सांगितले परंतु पोलीस प्रशासनाकडे निवेदन ना देता आम्ही निवेदन तहसीलदारांना देणार आहोत असे गावाकऱ्यांनी सांगितले.माढा तहसीलदार विनोद रणवरे यांनी क्षणाचाही विलंब ना करता तातडीने अंजनगाव येथे मोटर सायकलवर दाखल झाले.यावेळी सर्व गावाकऱ्यांच्या वतीने तहसीलदार विनोद रणवरे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी विनायक चौगुले ,सज्जनराव जाधव, नवनाथ इंगळे, आदिनाथ इंगळे, शुभम पाटेकर ,ओंकार चव्हाण, अंकुश लटके, प्रशांत नाईकनवरे, उपळाई खुर्द चे क्रांतीकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच आप्पासाहेब वाघमोडे माजी उपसरपंच भागवत चौगुले युवक नेते प्रदीप चौगुले समाधान इंगळे महादेव गडेकर अंकुश लटके लखन डोके आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

litsbros

Comment here