माढा तालुका बहुजन ब्रिगेड संघटनेची कार्यकारिणी जाहीर;तालुका संपर्कप्रमुख दिपक राणे तर तालुकाध्यक्ष…..
माढा प्रतिनिधी : बहुजन ब्रिगेड संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या उपस्थितीमध्ये बहुजन ब्रिगेड संघटनेची बैठक पंढरपूर येथील विश्रामगृह येथे पार पडली.या बैठकीमध्ये बहुजन ब्रिगेड संघटना माढा तालुक्याच्या कार्यकारणी जाहीर करण्यात आहे.
बहुजन ब्रिगेड संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रथमेश अडगळे,पंढरपूर शहराध्यक्ष अमोल घोडके यांच्या वतीने
यावेळी अंजनगाव खेलोबा येथील दिपक राणे यांच्याकडे माढा तालुका संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली तर युवा तालुकाध्यक्षपदी नागेश पाटोळे यांची निवड करण्यात आहे. तसेच संजय गायकवाड यांना जिल्हा कार्यकारणी वर घेण्यात आले आहे.
या बैठकीला सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रथमेश आडगळे पंढरपूर शहराध्यक्ष अमोल घोडके,पंढरपूर तालुकाध्यक्ष महादेव मस्के,विशाल नाईक सर, रोहित साठे,राजू पाटोळे,नितीन पाटोळे,प्रकाश पाटोळे,ऋतुराज भोईरकर,केशव पाटोळे,महेश साठे सुषम अशोक मोरे इत्यादींच्या उपस्थित यावेळी निवडीचे पत्र पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या हस्ते देण्यात आले.
माढा तालुका संपर्कप्रमुख पदी दिपक राणे तर तालुका अध्यक्षपदी नागेश पाटोळे यांची निवड करण्यात आल्याने अंजनगाव ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
Comment here