माढासोलापूर जिल्हा

माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई रखडली; प्रहार करणार आसूड आंदोलन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई रखडली; प्रहार करणार आसूड आंदोलन

माढा प्रतिनिधी
माढा तालुक्यातील माढा, दारफळ, म्हैसगाव या सर्कल मध्ये ऑक्टो 2022 मध्ये सततच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालेले होते. शासनाच्या आदेशानुसार त्याचे पंचनामे ही झालेले आहेत. परंतु अद्याप पर्यंत देखील शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई अनेक वेळा तोंडी पाठपुरावा करून देखील मिळालेली नाही. तरी सरकार आणि प्रशासनाची याबाबतीत शेतकऱ्या प्रती अनस्था असल्याचे दिसून येत आहे. त्या बाबीकडे सरकार आणि प्रशासन यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

दारफळ , माढा, म्हैसगाव सर्कल मधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अन्यथा प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता माढा तहसील कार्यालयात प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने आसूड आंदोलन करण्यात येणार आहे .होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार असेल.

हेही वाचा – आमदार शिंदे बंधूंचा जुनी पेन्शन योजने संदर्भातील कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपास पाठिंबा जाहीर दोघांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले पाठिंबा जाहीर केल्याचे लेखी पत्र

८७ महिन्यांचा थकीत पगार न मिळाल्याने ‘आदिनाथ’ चा दिव्यांग कर्मचारी मागतोय करमाळ्यातील गल्ली बोळांतून भीक; बागलांनी राजकीय आकसातून घरी बसावल्याचा आरोप

या प्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पंडित साळुंके, तालुका अध्यक्ष अमोल केसरे , आपचे जिल्हा अध्यक्ष संतोष कवले, विद्यार्थी तालुका सचिव संतोष कोळी, आबासाहेब कोळेकर , दत्तात्रय नाईकवाडे, किरण लवटे, रविकांत कोळेकर, अतुल थोरात, रमजान मुलानी, धीरज भांगे, संदीप चव्हाण, नितीन बापूराव चव्हाण, आदित्य लवटे, प्रणित वाघमारे उपस्थित होते.

litsbros

Comment here