आरोग्यमाढासोलापूर जिल्हा

माढा येथील नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे गुरुवारी उद्घाटन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा येथील नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे गुरुवारी उद्घाटन

माढा / प्रतिनिधी- माढेश्वरी बँक सांस्कृतिक मंडळ व विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगाव (टें) यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 9 ते 12 फेब्रुवारी या कालावधीत माढा येथे मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले असून या शिबिराचे उद्घाटन 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामती येथील एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते व पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती बँकेचे व्हा.चेअरमन अशोक लुणावत यांनी दिली आहे.

जागतिक कीर्तीचे नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने व नेत्ररोगतज्ञ डॉ.रागिणी पारेख यांच्या सहकार्यातून 9 फेब्रुवारी रोजी सर्व रुग्णांची नेत्र तपासणी, 10 व 11 फेब्रुवारी रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि 12 फेब्रुवारी रोजी समारोप होणार आहे. या कालावधीत रुग्णांची मोफत निवासाची व भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे.या शिबिरामध्ये 2 हजारच्या आसपास लोकांच्या नेत्र तपासणी आणि 400 ते 500 रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन आहे तरी या नेत्र शिबिराचा लाभ गरजूंनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी,आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे,माजी आमदार धनाजीराव साठे,जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, कृषीभूषण सुनंदाताई शिंदे,

हेही वाचा – मानेगाव येथील पाणलोट विकास समितीच्या सचिवपदी राजेंद्र भोगे यांची बिनविरोध निवड

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करमाळा – माढा मतदारसंघातील ‘या’ ग्रामीण रस्त्याच्या कामासाठी 38 कोटी 65 लाख निधीची तरतूद; आ.संजयमामा शिंदे यांची माहिती

प्रांताधिकारी ज्योती कदम,तहसीलदार राजेश चव्हाण, अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख,वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनंदा रणदिवे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सोनिया बागडे, डॉ.एकनाथ बोधले,डॉ.गणेश इंदुलकर सपोनी शाम बुवा, डॉ.रामचंद्र मोहिते, झुंजार भांगे,डॉ.नंदकुमार घोळवे उपस्थित राहणार आहेत.

litsbros

Comment here