लोकसभेचे माढा मतदारसंघाचे ‘हे’ संभाव्य उमेदवार एक जानेवारी रोजी येणार करमाळा दौऱ्यावर
करमाळा (प्रतिनिधी);
माढा लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट उमेदवार श्री अभयसिंह जगताप हे येत्या एक जानेवारी 2024 अर्थात नवीन वर्षी करमाळा येथे मतदारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भेट देणार आहे.
दिनांक एक जानेवारी 2024 रोजी करमाळा येथील नवीन शासकीय विश्रामगृह येथे दुपारी एक वाजता जगताप यांचे आगमन होणार असून यावेळी शहरातील मतदारांच्या गाठीभेटी घेणार असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते येणार असल्याचे त्यांच्या राजकीय निकटवर्तीय मधून बोलले जात आहे.
जगताप हे माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटामधून संभाव्य उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे माढा लोकसभेचे संभाव्य खासदार अभय जगताप यांचा म्हसवड, ता. माण परिसरात जनसंपर्क दांडगा असून याच माध्यमातून ते येत्या 2024 च्या लोकसभा माढा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे ते एक युवा उमेदवार असल्याने माढा लोकसभा मतदारसंघातील विविध सोडवण्या कामे प्रयत्नशील राहतील असे सांगितले जात आहे.
सोलापुर जिल्ह्यामधे विविध नावाजलेल्या घराण्यांनी दिर्घकाळ राजकारण केले परंतु सोलापुर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी उच्चशिक्षीत आणि विकासाचा नविन दृष्टीकोण असलेल्या युवा चेहर्याला संधी मिळावी अशी भावना सर्वसामान्य नागरीकांमधे वाढु लागली आहे.
Comment here