लेखक जगदीश ओहोळ यांनी घेतली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची भेट; ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक दिले भेट
(प्रतिनिधी); “जग बदलणारा बापमाणूस” या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक व व्याख्याते जगदीश ओहोळ यांनी आज मुंबईत राजगृह या ऐतिहासिक वास्तूत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली व आपले नवे पुस्तक “जग बदलणारा बापमाणूस” आदरणीय साहेबांना भेट दिले. यावेळी जगदीश ओहोळ व बाळासाहेब यांच्यात पुस्तकासह इतर विषयांवर ही चर्चा झाली.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचा मागवा घेताना जगदीश ओहोळ यांनी बाबासाहेबांच्या आयुष्यातील प्रसंग व आजच्या पिढीला त्यातून प्रेरणादायी म्हणून काय घेता येईल? या गोष्टीचा मागोवा या पुस्तकातून घेतलेला आहे. सध्या महाराष्ट्रभर या पुस्तकाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. या पुस्तकाला माजी खासदार, विचारवंत डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांची प्रस्तावना असून ज्येष्ठ विचारवंत, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध या पुस्तकाचे लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांचा अभिप्राय व पाठराखण आहे.
अमन आनंदराज आंबेडकर यांना ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक भेट देताना लेखक व व्याख्याते जगदीश ओहोळ
हेही वाचा – मालवाहतूक ट्रकच्या धडकेने 5 गाभण म्हशी मृत्युमुखी सोलापूर तुळजापूर मार्गावरील दुर्घटना
त्याचबरोबर या पुस्तकाला महाराष्ट्रातील अनेक अभ्यासक व विचारवंतांनी अभिप्राय दिलेला आहे व शुभेच्छा दिलेले आहेत. प्रकाशनानंतर दुसऱ्याच दिवशी चैत्यभूमीवर या पुस्तकाची विक्रमी विक्री झाली व महाराष्ट्रभर सध्या हे पुस्तक चर्चेत आलेले आहे. हे पुस्तक लेखक जगदीश ओहोळ यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना भेट म्हणून दिले आहे, त्यामुळे आता अनेकांना या पुस्तकाविषयी अधिक उत्सुकता निर्माण झालेली आहे.
– जगदीश अशोक ओहोळ, 9921878801
*पुस्तकासाठी संपर्क करा 8956960801
Add Comment