केत्तूर येथे महिला दिन उत्साहात साजरा
केत्तूर ( अभय माने) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केत्तूर नंबर 2 (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला दिन मोठ्या मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी महिलांची संख्या ही मोठ्या प्रमाणात होती. यावेळी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम सरस्वती, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, तसेच भारत मातेच्या प्रतिमेचे महिलांचे हस्ते पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना उज्वला निंभोरे म्हणाल्या की, संघर्ष हा आयुष्यात न सांगता वादळासारखी येत असतात त्यामुळे खचून जातात त्यावर मात करणे महत्त्वाचे आहे.तसेच यावेळी तेजस्विनी महानवर,वनिता पानसरे,तेजस्विनी शेंडगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला व हम किसीसे कम नही हे दाखवून दिले. यामध्ये संगीत खुर्ची, लिंबू चमचा,उखाणे अशा विविध स्पर्धां झाल्या. विजेत्या स्पर्धकांना स्पर्धेनंतर लगेच बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन जेष्ट शिक्षिका वनिता पानसरे,सुवर्णाकाळे,उज्वला निंभोरे यांनी केले तर विजेत्यांना सर्व बक्षिसे माधुरी खाटमोडे यांचे हस्ते देण्यात आली.ज्येष्ठ महिलांचा सन्मानही यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णा काळे यांनी केले तर आभार उज्वला निंभोरे यांनी मानले.
छायाचित्र : केत्तूर ( ता.करमाळा) : कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिला.