केमसोलापूर जिल्हा

केम येथे वळेकर यांच्या रानात कोब्रा नाग; सर्पमित्र अतुल ढावरे यांनी पकडून जंगलात सोडला

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथे वळेकर यांच्या रानात कोब्रा नाग; सर्पमित्र अतुल ढावरे यांनी पकडून जंगलात सोडला

केम(प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील केम गावातील रवि वळेकर यांचे शेतात कोब्रा नाग असल्याचे दिसून आल्यानंतर सर्पमित्र अतुल चंद्रकांत ढावरे रा.केम यांनी त्यास पकडले आणि सरकारी वण क्षेत्रात सोडून दिले. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रवि वळेकर यांना कोब्रा नाग दिसून आला होता.

त्यांनी तातडीने सर्प मित्र यांना बोलावून घेतले. ढावरे यांनी आपले कौशल्य दाखवत नागाला खूप सहज पकडले.

रविदादा वळेकर यांनी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान केले आहे की सर्प हे शेतकऱ्यांचे मित्र असल्याने त्यांना न मारता सर्प मित्र यांचेशी संपर्क साधावा.

सर्प मित्र अतुल ढावरे यांचा संपर्क नंबर आहे – 7387814784. अतुल हे केम येथील तरुण युवक शेतकरी आहेत. त्यांनी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान केले आहे की माझी मदत लागतं असेल तर एक फोन करा मी तातडीने येईल व सर्पाला जीवनदान देईन. त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देईन.
यावेळी त्यांना मदत करण्यासाठी मधुकर जनार्दन अवघडे आले होते.

हेही वाचा – केत्तूर येथील प्राचीन महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा भाविकांच्या गर्दीत उत्साहात संपन्न

मराठा निषेध मोर्चाने करमाळा दणाणला, हजारोच्या गर्दीने नोंदविला तीव्र निषेध; मोर्चामध्ये मुस्लिम समाजाच्यावतीने पाणी वाटप

यावेळी राज पठाण,लक्ष्मण वळेकर,दत्ता वळेकर,सुजित काळदाते, पिनु वळेकर, भैरु सांगडे,सोनू गुरव,दादा गुरव, पवि वळेकर, नाथा शिंदे,ईश्वर मस्के आदी ग्रामस्थ जमले होते.

litsbros

Comment here