करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

केळीच्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून मदत मिळावी, पालकमंत्र्यांकडे मागणी; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केळीच्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून मदत मिळावी, पालकमंत्र्यांकडे मागणी; वाचा सविस्तर

करमाळा(प्रतिनिधी); रविवार दिनांक ४ जून रोजी वादळी वारा व वीजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे करमाळा तालुक्यातील केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त होवून शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे .

तरी नुकसान झालेल्या भागातील केळीच्या बागांचे त्वरीत पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी भाजपाचे युवानेते तथा करमाळा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे .

हेही वाचा – कौतुकास्पद: केम येथे ए पी ग्रुपच्या वतीने १ जून रोजी गावातील १०१ जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस एकत्रितपणे उत्साहात साजरा; ज्येष्ठांना काठ्यांचे वाटप

करमाळा क्राईम; करमाळा महसूल विभागातील महिला अधिकारी काझी यांना वीस हजार रुपयांची लाच घेताना जेऊर येथे अटक

तसेच मौजे गुळसडी येथे वादळी वाऱ्याच्या तडाख्यात वीज कोसळून पती व मुलादेखत कमल अडसूळ हि महिला मृत्युमुखी पडली .

त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी देखील जगताप यांनी निवेदनाव्दारे केली आहे . निवेदनाच्या प्रती उचित कार्यवाही साठी आमदार संजयमामा शिंदे , जिल्हाधिकारी सोलापूर व तहसीलदार करमाळा यांना दिलेल्या आहेत.

litsbros

Comment here