*केत्तूर येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी*
केत्तूर (अभय माने) केत्तूर (ता.करमाळा) येथील मारुती मंदिरात शनिवार (ता.12) रोजी हनुमान जयंती अर्थात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
सकाळी 6.15 वा.हनुमान जन्मोत्सव साजरा झाला यावेळी फुलांची मुक्त उधळण करण्यात येऊन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.यावेळी हभप क्रांतिसिंह महाराज पाटील यांच्या उपस्थितीत हनुमान स्तोत्र व आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमानंतर सकाळी 10 ते 12 वा. हभप अशोक महाराज पवार वाल्हे (जेजुरी) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमान मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
सौ. ऋतुजा शिवकुमार चिवटे (हिंगमिरे)यांनी मिळवलेले यश युवा पिढीसाठी प्रेरणादायी-पत्रकार दिनेश मडके
परिसरातील केत्तूर नं.1, पारेवाडी, दिवेगव्हाण, हिंगणी, गुलमोहरवाडी, पोमलवाडी, टाकळी, वाशिंबे येथेही हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.