करमाळाकेम

केम येथे गुरूपौर्णिमा मोठया उत्साहात साजरी; वाचा सविस्तर 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथे गुरूपौर्णिमा मोठया उत्साहात साजरी; वाचा सविस्तर 

केम(संजय जाधव);  

केम तालुका करमाळा येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात गुरू पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली य गुरू पौर्णिमा चे आयोजन श्री ऊत्तरेश्वर देवस्थान मंहत जयंतगिरी महाराज व श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले.

या निमित्त सकाळी आठ वाजता श्री ऊत्तरेश्वर बाबा,दत्त मंदिर,नाग देवता नरसिंह मंदिर, ,्व विदयागिरी, महाराज रत्नागिरी महाराज कलिंगड महाराज यांच्या समाधीस अभिषेक करण्यात आला.

  

 या नंतर सकाळी दहा ते बारा या वेळेत ह,भ,प दादा बोंगाळे महाराज केम यांचे कीर्तन झाले त्यानंतर बरोबर बारा वा,पाच मि, मंदिरात गुलालाची उधळण करीत पुष्प वृष्टी करण्यात आली 

 व श्रींची आरती झाली त्यानंतर आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

या धार्मिक कार्यक्रमासाठी केम ग्रामस्थ व श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट मंहत जयंतगिरी महाराज यांनी परिश्रम घेतले.

litsbros

Comment here