करमाळा शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचे आगळे वेगळे दर्शन; एकादशी दिवशीच ईद असल्याने कुर्बानी न देण्याचा मुस्लिम समाजाने घेतला निर्णय
करमाळा (प्रतिनिधी); करमाळा शहरात आज शांतता समितीची बैठक झाली यामध्ये मुस्लिम समाजाने ऐतिहासिक तसेच हिंदू मुस्लिम ऐक्य राहील. या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे येत्या 29 जुलै रोजी मुस्लिम धर्मीयांचा बकरी ईद तसेच हिंदू धर्माचा एकादशी हे महत्त्वाचे दोन सण एकाच दिवशी येतात.
यामुळे एकादशीसाठी करमाळा शहरातून महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या करमाळा शहरातून पंढरपूरच्या यात्रेकरिता जात असतात दिनांक 29 जून रोजी एकादशी असल्याने तसेच करमाळा शहरातून हजारो वारकऱ्यांची वर्दळ असल्याने मुस्लिम समाजाने मनाचा मोठेपणा करीत बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बानी करण्याचा ऐतिहासिक निर्णय सदर शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
सदरची बैठक करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस कार्यालयात पार पडली यावेळी सदर बैठकीमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी सदरचा महत्वाचा निर्णय घेतला.
या बैठकीमध्ये माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, कलीम काझी सर, उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी, अतिक वेग, मुस्तकीम पठाण, आझाद शेख, फारूक बेग, सोन्या चिवटे, माजी नगरसेवक नजीर अहमद कुरेशी, आयुब शेख, नागेश शेंडगे, फारुख जमादार, पत्रकार नाशिर कबीर, जिशान कबीर, सुरज शेख आदी मुस्लिम बांधव बहुसंख्य वर्गाने उपस्थित होते.
मुस्लिम समाजाने घेतलेला ऐतिहासिक निर्णयाचे मात्र सर्व स्तरातून कौतुक होत आहे करमाळा शहरात गेली कित्येक वर्षापासून हिंदू मुस्लिम बांधव आपल्या वेगवेगळ्या सणात एकमेकांना बोलावून आपला आनंद द्विगुणीत करतात.
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून आजही मुस्लिम बांधवाबरोबर हिंदू बांधव देखील एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून कामे करतात नवरात्र महोत्सव असो अथवा गणपती उत्सव किंवा रमजान ईद मोहरम या सर्व सणात हिंदू मुस्लिम एकतेचे आजही करमाळा शहरात आगळेवेगळे दर्शन घडते.
Comment here