करमाळा

केतूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केतूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

केत्तूर,(अभय माने): भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त केत्तूर (ता.करमाळा) येथे विविध ठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

    भैरवनाथ चौक,ग्रामपंचायत कार्यालय तसेच हनुमान मित्र मंडळाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.

     माजी सरपंच उदयसिंह मोरे पाटील,अॅड.अजित विघ्ने, किशोर जाधव यांनी आपले विचार मांडले तर यशवंत गायकवाड आपले विचार मांडताना म्हणाले की,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकांना मताचा अधिकार मिळाला.त्यांची शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा ही शिकवण आजच्या काळात महत्त्वाची आहे.यावेळी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. महिला मंडळाची उपस्थिती लक्षणीय होती.

litsbros

Comment here