करमाळाशैक्षणिक

करमाळा तालुक्यातील कुंभेजच्या लेकीची आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील कुंभेजच्या लेकीची आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड

केत्तूर (अभय माने): कुंभेज (ता.करमाळा) येथील श्वेता संपतराव शिंदे या सध्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात एम् टेक पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असून,विद्यापीठामार्फत तिची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण अभ्यास दौऱ्यासाठी एशियन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, बँकॉक, थायलँड येथे निवड झाली आहे.

 या ठिकाणी होणाऱ्या जीऑग्राफीक इन्फॉर्मेशन सिस्टीम अॅण्ड रिमोट सेन्सिग या विषयावरील प्रशिक्षणात ती सहभागी होण्यासाठीथायलंड येथे रवाना झाल्या आहेत.

   श्वेता शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण कुंभेज,जेऊर (ता.करमाळा) येथे झाले तर माध्यमिक शिक्षण सुयश गुरुकुल,सोलापूर येथे व पदवी, पदव्युत्तर तर शिक्षण परभणी येथे होत आहे.

   श्वेता शिंदे या करमाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विश्वस्त श्री.स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोट. संपतराव (भारतराव) शिंदे पाटील यांची कन्या आहे.

litsbros

Comment here