करमाळाशैक्षणिक

श्री उत्तरेश्वर विद्यालय केम येथे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व विद्यार्थी स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री उत्तरेश्वर विद्यालय केम येथे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व विद्यार्थी स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

केम(प्रतिनिधी);- श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम ता. करमाळा जि.सोलापूर या ठिकाणी दिनांक 16/02/2023 रोजी इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थी निरोप समारंभ आणि विद्यार्थी स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून यशकल्याणी सेवाभावी संस्था करमाळाचे अध्यक्ष गणेशभाऊ करे पाटील, सामाजिक विचारवंत व्याख्याते ॲड. बाबुरावजी हिरडे , व्याख्याते प्रा.डॉ मारुती लोढें, आकाश भोसले, शेखर तात्या गाडे , राजेंद्र गोडसे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दयानंद तळेकर, संदीप तळेकर, वसंत तळेकर सर, नितीन तळेकर, के.आर सुरवसे सर, सचिन रणशृंगारे, सतीश देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

      

 यावेळी कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.

  या समारंभाचे प्रमुख पाहुणे मा.श्री गणेशभाऊ करे पाटील यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. त्यांनी परमपूज्य बापूजी साळुंखे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. व ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांचे जीवनात असलेले महत्त्व सांगितले.

  ॲड.श्री बाबुरावजी हिरडे यांनी चारित्र्य आणि संयम या गोष्टीला विद्यार्थी जीवनात असणारे महत्त्व सांगितले. मराठी साहित्यातील अनेक संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. 

     यावेळी प्रा मारुती लोंढे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधी आणि आत्मविश्वास याबाबत मार्गदर्शन केले. व दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी करिअर मार्गदर्शन केले.   

या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा, गुरुदेव कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे हितचिंतक , ग्रामस्थ व मागील वर्षी दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रतिष्ठित मंडळींनी जाहीर केलेली हजारो रुपयांची बक्षिसे विद्यार्थ्यांना देण्यात आली. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री सुभाष कदम यांनी केले. NMMS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे विभागातस्तरीय स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी निरोप समारंभात शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी शाळेला साउंड बॉक्स भेट दिला.

सूत्रसंचालन प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री कुंडलिक वाघमारे यांनी केले. 

या निरोप समारंभाच्या कार्यक्रमानंतर दुपारी विद्यार्थी स्नेहसंमेलन कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात पार पडला.

 कोरोना काळानंतर प्रथमच विद्यार्थ्यांच्या पालकांनी या कार्यक्रमास खूप मोठ्या संख्येने हजेरी लावली व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमास विद्यार्थी तसेच केम पंचक्रोशीतील ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी स्नेहसंमेलन चे उद्घघाटन पोलीस स्टेशनचे जाधव साहेब यांनी केले.

 यावेळी सरदार पठाण भाजप तालुका अध्यक्ष गणेश आबा तळेकर, सोमनाथ देवकर, किरण तात्या तळेकर शालेय समितीचे अध्यक्ष दयानंद तळेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन रणशृंगारे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्याकडील असलेल्या कलागुणांनी उपस्थितांचे मने जिंकली विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन श्री वाघमारे के.एन सर यांनी केले.

 विद्यार्थी स्नेहसंमेलन कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. दहावी व बारावी विद्यार्थी निरोप समारंभ आणि विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

litsbros

Comment here