करमाळा

करमाळा येथे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आज सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; २१ जोडपी होणार विवाहबद्ध

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा येथे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आज सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; २१ जोडपी होणार विवाहबद्ध

करमाळा (प्रतिनिधी); श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने उद्या अकरा फेब्रुवारी रोजी २१ सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केली असल्याची माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली

याबाबत अधिक माहिती देताना चिवटे म्हणाले की दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय समोरील प्रांगणात 21 सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

सदर सामुदायिक विवाह सोहळ्याची जोरदारपणे तयारी झाली असून यामध्ये एक बौद्ध पद्धतीने व बाकीचे सर्व हिंदू पद्धतीने सामुदायिक विवाह सोहळा लावण्यात येणार आहे.

यामध्ये दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे सदरचा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत असल्याचे श्री चिवटे यांनी बोलताना सांगितले.

litsbros

Comment here