करमाळाक्राइम

कंदर येथे विजेच्या धक्क्याने कंत्राटी वायरमनचा मृत्यू; मृत्यूस जबाबदार असणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कंदर येथे विजेच्या धक्क्याने कंत्राटी वायरमनचा मृत्यू; मृत्यूस जबाबदार असणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

जेऊर (प्रतिनिधी); 

     कंदर ता करमाळा येथील ट्रान्सफार्मचे काम करताना विजेचा धक्का लागल्याने कंत्राटी वायरमन चा जागीच मृत्यू झाला आहे.गोविंद बाबुराव खोडवे वय २८ मूळ गाव-येलडा ता अंबाजोगाई जि बीड असे मयत झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. खोडवे यांच्या मृत्यूला कंदर येथील सहाय्यक अभियंता ओमकार परीट हे जबाबदार असून त्वरित त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी कंदर परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

   

सोमवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली आहे.मागील दीड- दोन वर्षांपूर्वीही कंदर येथे काम करताना वायरमन चा मृत्यू झालेला होता.सोमवारी नदीजवळच शेतात विजेच्या ट्रान्सफार्मचे काम करताना ही घटना घडली आहे.अचानक रोहित्रातून विद्युत प्रवाह आल्याने रोहित्राला चिटकून वायरमन गोविंद खोडवे याचा जागीच मृत्यू झाला.

मयत गोंविद हा वीज पुरवठ्यात तांत्रिक बिगाड झाल्या मुळे तो नदी काठच्या डीपी वरती चढला असता त्याला विजेचा जबर धक्का बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

 त्याने काम करण्याचा अगोदर सबस्टेशन मधुन परमिट घेतले होते. कंदर गावासाठी वीज पुरवठा करण्यासाठी तीन फिटर तयार करण्यात आले आहेत. त्याने कंदर बॅक वॉटर आणि कंदर व्हिलेज या दोन फिटर बंद करून घेतले.

मागील पंधरा दिवसापूर्वी कंदर भगीरथ वरून त्याच लाईनच्या खालून कमी अंतर ठेवून लाईन ओढली होती. अंतर पाच फूट ठेवणे गरजेचे होते तसे न करता कमी अंतर असल्यामुळे तारेला तार चिकटल्या मुळे बंद असलेल्या फिटरला विद्युत मिळाला त्या मुळे काम करत असताना त्याचा जागीच मृत्यु झाला असे गावात चर्चा होती.

घटनास्थळी करमाळा पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी पाहणी केली.या घटनेचा पंचनामा पोलिसांनी करून मृतदेह करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला आहे.करमाळा पोलिसात याबाबत गुन्हा नोंद झाला आहे.

या घटनेमुळे कंदर मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. विजेचे काम करताना शॉक लागून हा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात असून याची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

सर्वांना मदत करणारे गोविंदा म्हणून त्यांची गावात परिचय-

गोविंद खोडवे हे मागील ४-५ वर्षांपासून कंदर येथे काम करत होते.गावातील सर्व युवक वर्गात ते मिळून मिसळून वागत असल्याने सगळ्यांशी चांगला स्नेह होता.गावात रात्री-अपरात्री लाईट गेल्यावर एका कॉलवर ते उपलब्ध होऊन लाईट जोडून देत असत.गावातील सर्व युवक वर्गाशी ते नेहमीच सहकार्याने वागत असत.

कंदर येथील सहाय्यक अभियंता नियमित गैरहजर राहत असून तेच कंत्राटी वीज कर्मचारी खोडवे यांच्या मृत्यू जबाबदार असून त्यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे, अशी मागणी कंदर शहर तसेच परिसरातील नागरिकांमधून जोर धरीत आहे.

litsbros

Comment here