करमाळाधार्मिक

केत्तूर येथील श्री किर्तेश्वरी मंदिरासमोरील सभा मंडपाचे काम अंतिम टप्प्यात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केत्तूर येथील श्री किर्तेश्वरी मंदिरासमोरील सभा मंडपाचे काम अंतिम टप्प्यात

केत्तूर (प्रतिनीधी); ता.12 अवघ्या दोन दिवसावर आलेल्या नवरात्र उत्सवाची तयारी केतूर नंबर 2 (ता. करमाळा) येथे जोरदार चालू असून श्री कीर्तेश्वरी देवीच्या मंदिरासमोर मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत असलेल्या सभा मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

   घटस्थापनेच्या दिवशी तुळजापूरहून तरुण मंडळी ज्योत आणतात ही ज्योत गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून मंदिरात घटस्थापना केली जाते. 

नऊ दिवस देवीच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मंदिराभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

छायाचित्र-मंदिरासमोरील सभा मंडपाचे काम

litsbros

Comment here