आरोग्यकरमाळा

केत्तुर येथे रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केत्तुर येथे रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

केत्तुर (अभय माने): येथील श्री किर्तेश्वर गणेश उत्सव तरुण मंडळाने सामाजिक उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कमला भवानी ब्लड बँक करमाळा यांच्या सहयोगाने हे शिबीर यशस्वी झाले,यात पंचक्रोशीतील शंभरहून जास्त युवकांनी सहभाग घेतला. कृष्णा वस्त्रदालन समोरील प्रांगणात शिबिराचे आयोजन केले होते.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कर्तेशवर गणेश मंडळाचे अध्यक्ष रणजित नवले,उपाध्यक्ष केतन मोरे,खजिनदार राजकुमार देवकर या पदाधिकारी यासह सुरज शेंडगे,स्वप्नील चमरे, 

इंद्रजित काटकर,सुदर्शन मारवाडी,श्रीपाद ठोंबरे,आकाश शेंडगे,शंभू खैरे,विकास देवकर,अवि साठे,ओंकार जरांडे,सागर नरुटे आदींनी परिश्रम घेतले.

litsbros

Comment here