करमाळा

मध्यरात्रीपर्यंत जीव धोक्यात घालून वीज कर्मचाऱ्यांनी केला करमाळा शहर व 35 गावांचा विज पुरवठा सुरळीत

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मध्यरात्रीपर्यंत जीव धोक्यात घालून वीज कर्मचाऱ्यांनी केला करमाळा शहर व 35 गावाचा विज पुरवठा सुरळीत

करमाळा (प्रतिनिधी);

मंगळवारी खंडित झालेला वीजपुरवठा दुरुस्त करण्यात आल्यानंतर रात्री दहा वाजता नेमका घोटाळा कुठे आहे हे लक्षात आलं. यावेळी वीज कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून अंधाऱ्या रात्रीत अंडरग्राउंड लाईटच्या केबल चे काम करून करमाळा शहर व 35 गावचा वीज पुरवठा तात्काळ सुरू केला.

मुख्य मुख्य प्रशासकीय अधिकारी गैरहजर असताना सुद्धा वायरमन लोकांनी केलेल्या कामामुळे वायरमन लोकांचे कौतुक होत आहे.

करमाळा सहाय्यक विजअभियंता दीर्घकालीन रजेवर असून त्यांचा चार्जेस जेऊर येथील वीज अभियंत्याकडे आहे.

जेऊर येथील अभियंता सुद्धा रजेवर गेलेले आहेत. असे असताना अचानक करमाळा शहराचे उपस्थित गावाचा विद्युत पुरवठा बंद झाला होता.

साठी मांगी सब स्टेशन ते करमाळा सब स्टेशन सर्व विद्युत लाईन वायरमन लोकांनी चेक केली मात्र घोटाळा निष्पन्न झाला नाही.

आवाटी ते रस्त्याचे काम सध्या चालू असून या रस्त्याचे ठेकेदाराने देवीच्या माळाच्या पायथ्याशी खोदलेल्या रस्त्यात अंडरग्राउंड गेलेली वीज महामंडळाची केबल तुटलेली होती.

अद्यावत यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे घोटाळा निष्पन्न होऊ शकला नाही.

 घोटाळा निष्पन्न झाल्यानंतर रात्रीच्या आठ वाजले होते अशा परिस्थितीत  शहराधिकारी श्री शिंदे, श्री वाघमारे व त्यांचे कर्मचारी व ठेकेदार  बुडवे पुराणिक ढेरे यांनी मिळून विद्युत पुरवठा सुरू केला.

litsbros

Comment here