करमाळा

युवासेनेचे करमाळा तहसीलदार ‘या’ विविध मागण्यांसाठी निवेदन: मागण्या मान्य न झाल्यास १४ ऑगस्टपासून उपोषण 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

युवासेनेचे करमाळा तहसीलदार ‘या’ विविध मागण्यांसाठी निवेदन: मागण्या मान्य न झाल्यास १४ ऑगस्टपासून उपोषण 

करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख); उस बिल , अतिवृष्टी अनुदान, सततच्या पावसाने झालेली नुकसान भरपाई ,प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेतील समस्यांबाबत ठाकरे गटाच्या युवासेनेकडुन तहसीलदार विजयकुमार जाधव यांना आज निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातील मागण्या मान्य न झाल्यास १४ ऑगस्ट पासुन अमरण उपोषण करण्याचा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिला आहे.

तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाने नुकसान झाल्यानंतर शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले होते .

मात्र करमाळा तालुक्यातील पात्र यादीत नावे असून देखील हजारो शेतकऱ्यांना नऊ महिने झाले तरी नुकसानभरपाई मिळालेली नाही. अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेला शेतकरी तलाठी तहसिल कार्यालयात हेलपाटे मारून बेजार होत आहे .त्याचबरोबर तालुक्यातील कमलाई मकाई कारखान्याकडुन नोव्हेंबर डिसेंबर मध्ये गाळपास गेलेल्या उस बिलाचा पहिला हप्ता देखील दिलेला नाही .

एफ आर पी कायद्यानुसार पंधरा दिवसांत बिलं अदा करणे गरजेचे असताना कायद्याचे उल्लंघन केलेले आहे.साखर आयुक्तांकडून या कारखानदारांवर कारवाई करण्याचे आदेश असताना चालढकल केली जात आहे .आपल्या हक्काच्या घामाचे दाम मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे . त्यामुळे तात्काळ उस बिल अदा करावीत अन्यथा या कारखान्यावर आर आर सी कायद्यानुसार जप्तीची कारवाई करावी. 

          प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांचा डेटा गायब झालेला असल्याने मागील वर्षांपासून पि एम किसान चे हप्ते जमा झाले नाहीत. काही लाभार्थ्यांना तर चक्क मयत दाखवले गेल्याने एक वर्षापासून अनुदान प्राप्त होत नाही.वारंवार मागणी करून देखील कार्यवाही केली जात नाही. 

शासनाने सतत च्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत मात्र तालुक्यातील करमाळा कोर्टी मंडलात सततचा पाऊस होवुन देखील नुकसानभरपाई मिळालेली नाही त्या संदर्भात करमाळा महसूल विभागाकडून काय कारवाई सुरु आहे त्याबाबत माहिती मिळावी.तसेच या शेतकऱ्यांना देखील अनुदान मिळावे. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. 

सदर मागण्याची दखल घेऊन या प्रश्नावर ठोस कार्यवाही चे लेखी पत्र देण्यात यावे अन्यथा दि १४ ऑगस्ट २०२३ पासुन सकाळी 11 वाजल्यापासून युवासेना ठाकरे गटाच्या वतीने अमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद असा इशारा देखील देण्यात आला आहे.

या वेळी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहूदादा फरतडे, धरणग्रस्त संघटनेचे उपाध्यक्ष भारत साळुंके युवासेना शाखाप्रमुख ओकांर कोठारे, उप शाखाप्रमुख मयुर तावरे,हरिश्चंद्र जाधव,लालासाहेब नलवडे,योगेश लोंढे,प्रशांत शेंडे, इंद्रजित शिंदे आदी उपस्थित होते.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!