करमाळाकोर्टी

करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे महसूल सप्ताह दिन मोठ्या उत्साहात साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे महसूल सप्ताह दिन मोठ्या उत्साहात साजरा

 

करमाळा (प्रतिनिधी):  दिनांक 1 ते 7 आगस्ट महसूल सप्ताह निमित्त मौजे कोर्टी तलाठी कार्यालय येथे महसूल दिन साजरा करण्यात आला. यामध्ये 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत नागरिकांना विविध प्रकारचे दाखले, ई हक्क प्रणाली बाबत मार्गदर्शन, ई पीक पाहणी बाबत मार्गदर्शन तसेच महसूल विषयक विविध योजनाची माहिती तलाठी कार्यालयाकडून देण्यात आली. तसेच नागरिकांच्या फेरफार संबंधी नोंदी निर्गत करून 7/12 उतारे देण्यात आले.

यावेळी कोर्टी महसूल मंडळ चे मंडळ अधिकारी बागवान युसूफ, कोर्टी तलाठी कल्याण स्वामी, वीट तलाठी महेश घाडगे, विहाळ तलाठी माधुरी पाटील, राहुल वैद्य, कोतवाल मधुकर बोराडे, पोलीस पाटील, बाळासाहेब पारखे, मनोहर शेरे, आबा अभंग, काशिनाथ सोलंकर , अजिनाथ हुलगे, पांडुरंग राऊत, पांडुरंग जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी मुन्ना शेख, दिलीप चव्हाण, मंडूबाई वायदंडे, रवी जाधव तसेच इतर नागरिक उपस्थित होते.

litsbros

Comment here