करमाळा

उबदार कपड्यांना मागणी वाढली

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उबदार कपड्यांना मागणी वाढली

केत्तूर ( अभय माने) : करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात अधून मधून थंडीचा कडाका वाढत आहे. त्यामुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) मधून टेंभुर्णी तालुका माढा येथे दाखल झालेले विक्रेते मोटरसायकल वरून स्वेटर्स, जॅकेट्स, ब्लॅंकेट, रजाई घेऊन दाखल होत आहेत. थंडी सुरू झाली असली तरी ढगाळ वातामुळे थंडी गायब होत आहे. उजनी जलाशयात 30 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या भागात काही प्रमाणात थंडी जाणवत आहे त्यामुळे उबदार कपड्यांना मागणी वाढत आहे. स्वेटर्स, जर्किन, ब्लँकेट, कानटोप्या, रजई विक्रेते परराज्यातून परिसरात फिरत आहेत.

छायाचित्र- केत्तूर (ता.करमाळा)- परिसरात थंडीच्या कडाका वाढल्याने परराज्यातून उबदार कपडे विक्रेते दाखल झाले आहेत.

litsbros

Comment here