करमाळा तालुक्यात थंडीचा जोर लागला वाढू !
केत्तूर (अभय माने): करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्र परिसरात थंडीची चाहूल लागली असून ठीक ठिकाणी तरुण शेवगेट्या पेटवत असल्याचे दिसून येत आहे.
आठवडाभरपासून परिसरात थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे संध्याकाळी थंडीचा जोर कमी
असलातरी पहाटेच्या वेळी मात्र थंडीच्या जोर वाढू लागला आहे.
थंडी वाढू लागलयाने नागरीकांनी मगोधडी बाहेर काढली असून फलर, कानटोपी, स्वेटर स्कार्फ, वापरण्यास सुरुवात केली आहे.
पहाटेच्या वेळी शेकोट्या पेटवून त्याची उबदेखील नागरिक घेऊ लागले आहेत यावर्षी ऑक्टोबर हिट्स जोर वाढल्याने उष्णता होती परंतु आता थंडीचा जोरही वाढू लागल्याने शेतकऱ्यातून कडून समाधान व्यक्त केले जात आहे.
मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे.दरम्यान दुपारी उन्हाल उन्हाचे चटके आणि पहाटेच्या वेळी थंडी असे विषम हवामान पाहावयास मिळत आहे याविषयी हवामानामुळे सर्दीपडसे,खोकला,ताप यासारखे रुग्ण रुग्णालयात वाढू लागले आहेत.
थंडीचा जोर वाढत असला तरीही ग्रामपंचायत निवडणुकीमुळे मात्र वातावरण तापू लागले आहे. उजनी लाभ क्षेत्रातील केत्तूर, चिकलठाण कंदर , गुलमोहरवाडी आदि ठिकानच्या निवडणुका होत आहेत.
छायाचित्र- केत्तूर : थंडीपासून उब मिळविण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. ( छायाचित्र – अभय माने, केत्तूर)
Comment here