करमाळाराजकारण

मा.आ.जयवंतराव जगताप यांचा मा.आ.नारायण पाटील यांनी केला सत्कार!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मा.आ.जयवंतराव जगताप यांचा मा.आ.नारायण पाटील यांनी केला सत्कार!

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यावेळी बिनविरोध झाल्यानंतर सभापतीपदाची निवडणूक ही बिनविरोध झाली आणि सभापतीपदी माजी आमदार व नेते जयवंतराव जगताप यांची निवड झाल्याने जगताप गटामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

जयवंतराव (भाऊ) जगताप यांच्या या बिनविरोध निवडी नंतर आज माजी आमदार नारायण(आबा) पाटील यांनी भेट देऊन विशेष सत्कार केला.

करमाळा तालुक्यात सध्या 15 ग्रामपंचायतीची ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. पाटील यांचे सुपुत्र जेऊर ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी उमेदवार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जगताप गट व पाटील गट यांच्यात होत असलेले या पॅचअपचे पुढील राजकीय घडामोडीवर परिणाम होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी पाटील यांचाही सत्कार जगताप यांनी केला. यावेळी युवा नेते देवानंद बागल व आमृळे शेठ व इतर मान्यवर उपस्थित होते.

litsbros

Comment here