ऊसाला दर किती मिळणार? हे गुलदस्त्यातच! कारखाने होत आहेत गळीत हंगामासाठी सज्ज..
केत्तूर (अभय माने): शासनाकडून 1 नोव्हेंबर पासून उसाचा गळीत हंगाम (2023/24 ) सुरू होणार असे सांगितले जात असले तरी जिल्ह्यातील साखर कारखाने गळीत हंगामासाठी सज्ज होत आहेत.
काही कारखान्याची बॉयलर कुठली असून त्यांनी गळिताची तयारी केली आहे परंतु 2023/24 या गाळप हंगामासाठी ऊसासा दर काय देणार ? हे अद्यापपर्यंत जाहीर केले नाही हेच पण दराबाबत कारखान्याची चुप्पी आहे म्हणून सावध होत उत्पादकांनी चांगला दर देणाऱ्या कारखान्यांची निवड करावी लागणार आहे.
उसाला चांगला जर मिळाला पाहिजे अशी ऊस उत्पादकांची मागणी आहे. गेल्या काही वर्षात खतांचे वाढलेली दर मजुरीचे वाढलेले दर पाहता ऊस शेती परवडत नाही अशी बोंब वारंवार होत असताना काही शेतकरी फळबागाकडे वळले आहेत.
ऊस उत्पादकांना योग्य दर मिळत नाही ही खरी शोकांतिका आहे.उसाच्या दराबाबत शेतकरी संघटनांनी आवाज उठवणे गरजेचे आहे.
Add Comment