करमाळा

काही दिवसातच उजनी धरण मायनस मध्ये जाईल, पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू ; क्लिक करून वाचा आताचा पाणी साठा किती?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

काही दिवसातच उजनी धरण मायनस मध्ये, पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू ; क्लिक करून वाचा आताचा पाणी साठा किती?

केत्तूर (अभय माने); गतवर्षी पाऊसकाळ जास्त प्रमाणात झाल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल होते. सध्याही पाणबोट परिसरात पाणीटंचाई नसली तरी उजनी जलाशयाचा पाणीसाठा अवघ्या 29 टक्केवर आला असून पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. त्यातच वाढलेल्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणावर होत आहे.

परंतु वाढत्या तापमानामुळे व उन्हाच्या कडाक्यामुळे उभी पिके लवकर पाण्याला येत आहेत पिकांना दिवसाआड पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.पाणी घटन्याची हीच परिस्थिती कायम राहिल्यास उन्हाळ्याचे आगामी तीन महिन्यांत उजनी धरण मायनसमध्ये जाणार आहे.

उजनी लाभक्षेत्र परिसरात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असले तरी फळबागांचे क्षेत्रही वाढत आहे. ऊस पिकाला पाणी भरपूर लागते त्याबरोबरच भाजीपाला पिकांनाही पाणी लागत आहे.

वरचेवर घटणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना पाईप, केबल, मोटर वाढवावे लागत आहेत दुसरीकडे शेतीसाठी आठ तास वीज मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिके जगण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

litsbros

Comment here