*करमाळा तालुक्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला*
केत्तूर (अभय माने) राज्यासह करमाळा तालुक्यातही फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाला होता ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली होती परंतु आता ढगाळ वातावरण हळूहळू निवळत असल्यामुळे तापमानाचा पाराही घसरू लागला आहे त्यामुळे यापुढे थंडी वाढणार असल्याचा अंदाज वेधशाळेने अंदाज व्यक्त केला आहे.
हेही वाचा – नारायण आबा पाटील यांच्या विजयाने करमाळा तालुक्यात उत्साहाचे वातावरण
गणेश चिवटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपात सक्रिय होण्याचे आदेश
यावर्षी सुरुवातीला गुलाबी थंडी,त्यानंतर हुडहुडी भरवणारी थंडी, त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे थंडी पूर्णपणे गायब झाली परंतु, गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळल्यानंतर आता कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे.
अचानकपणे बदलणाऱ्या या वातावरणाचा शेतातील पिकावर परिणाम झाला आहे तर मानवी जीवनावरही विपरीत परिणाम होत आहे.