करमाळा

शुक्रवारी करमाळा येथे बहुजन संघर्ष सेना करणार ‘या’ मागण्यांसाठी तहसील कचेरी समोर निदर्शने

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शुक्रवारी करमाळा येथे बहुजन संघर्ष सेना करणार ‘या’ मागण्यांसाठी तहसील कचेरी समोर निदर्शने

करमाळा(प्रतिनिधी); मणिपूर मधील हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरलेले बिरेन सिंह सरकार बरखास्त करा व राष्ट्रपती राजवट लागू करा तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मणिपूर येथील हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरल्याने अमित शहा यांचा राजीनामा घ्या.

 भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल व महात्मा गांधी, महात्मा फुले, इतर महामानवाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने देशद्रोही मनोहर उर्फ संभाजी भिडे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी.

 

या मागणीसाठी बहुजन संघर्ष सेना करमाळा तहसील कचेरी समोर 4 ऑगस्ट शुक्रवार रोजी ठीक ११:०० वाजता बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करणार आहे.

याची माहिती बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हा सचिव आप्पा भोसले यांनी दिली. लोकशाही व संविधानावर्ति प्रेम करणाऱ्या सर्व नागरिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहवे असे आवाहन अपा भोसले यांनी केले आहे.

litsbros

Comment here