करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील रब्बी हंगाम आला अंतिम टप्प्यात; मजुरांची कमतरता, हार्वेस्टर मशीनने उरकला गहू!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील रब्बी हंगाम आला अंतिम टप्प्यात; मजुरांची कमतरता, हार्वेस्टर मशीनने उरकला गहू!

केत्तूर(अभय माने); करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातील उजनी दाबूक्षेत्र परिसरात रब्बी हंगामातील गहू काढणीला आता वेग आला आहे. गेल्या काही दिवसापासून रोगट हवामान होत आहे.वारंवार वाता 1वरण बदलत आहे त्यातच वादळी वारे, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

अति पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला होता रब्बी हंगामही लांबला पावसामुळे लांबला होता. आता सर्व संकटातून रब्बी पिके वाचलेली असतानाच नेमका काढणीच्या वेळेस अवकाळी पाऊस,वादळी वारे व गारपीट यामुळे काढणीस आलेल्या गहू पीकाने अक्षरच्या जमिनीवर लोळण घेतली.

त्यातच मजुराच्या साह्याने गव्हाची मळणी करणे शक्य नसल्याने हार्वेस्टर मशीनने गहू करण्यात येत आहे त्यामुळे मशीनच्या मागे लागावे लागत आहे.हार्वेस्टर मशीनचे दरही 2800 ते 3000 रुपये एकर असा आहे.त्यातच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गव्हाला पांढरा रंग आला आहे.त्यामुळे गव्हाची प्रतवारी घसरली आहे.

रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने गव्हाची आवक मोठ्या प्रमाणावर बाजारात होत आहे त्यामुळे गव्हाचे दर 2100 ते 2300 रुपये क्विंटल अशाप्रकारे खाली उतरले आहेत.

छायाचित्र- हार्वेस्टर मशीनद्वारे गव्हाची मळणी करीत असताना.

litsbros

Comment here