बागल गटाला दणका; मांगी गावच्या बागल गटाच्या सरपंच सौ.निर्मला बागल यांचे सरपंचपद रद्द; आ.शिंदे समर्थक सदस्यांनी घेतली होती हरकत
करमाळा(प्रतिनिधी); – मांगीच्या सरपंच सौ निर्मला दत्तात्रय बागल यांचे सरपंच पद जिल्हाधिकारी सोलापूर यांनी निरर्ह (अपात्र)घोषित करत रद्द केले आहे. यामुळे बागल गटाला हा जबरदस्त धक्का मानला जात आहे.
याबाबत आमदार संजयमामा शिंदे समर्थक ग्रामपंचायत सदस्य सुजीत बागल, कु . स्नेहल अवचर , सौ शहाबाई नरसाळे, सौ.चतुराबाई शिंदे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे ॲड. कमलाकर वीर यांचेमार्फत सरपंच निर्मला बागल यांनी तब्बल दीड वर्षे ग्रामपंचायतीची सभा घेणे बाबत कसूर केलेने त्यांना सरपंच पदावरून अपात्र करणेबाबत अपील दाखल केले होते.
सुनावणी दरम्यान ॲड वीर यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी व योग्य न्यायनिवाडे सादर केले. दरम्यान आगामी मकाई, आदिनाथ, जि .प .पं.स निवडणुकीच्या तोंडावर बागल गटाला हा जबरदस्त धक्का मानला जात आहे. दोन वर्षापूर्वी अत्यंत चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बागल गटाचे ५ तर शिंदे गटाचे ४ सदस्य विजयी झाले होते.
स्वतःच्या गावची ग्रामपंचायत टिकविताना माजी आमदार बागल, रश्मी बागल, दिग्विजय बागल यांनी मोठी शर्थ केली आहे. या अपिलामधे अर्जदार ग्रामपंचायत सुजीत बागल व अन्य ३ यांचेवतीने ॲड. कमलाकर वीर व सरपंच निर्मला बागल यांचेवतीने ॲड. नानासाहेब शिंदे यांनी काम पाहीले.
निर्णयानंतर आ.शिंदे समर्थकांनी जल्लोष केला व अजून ३ झटके बाकी आहेत असे देखील सूचकतेने सांगीतले. या घोषणा नंतर आता पुढे अजून काय होणार.? याची लोकांना उत्सुकता लागली आहे.
Comment here