करमाळा

मकाईच्या बिलासाठी करमाळा तहसील समोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; शेतकऱ्यावर जीव द्यायची वेळ का आली? बागल विचार करणार का?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मकाईच्या बिलासाठी करमाळा तहसील समोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; शेतकऱ्यावर जीव द्यायची वेळ का आली? बागल विचार करणार का?

करमाळा (प्रतिनिधी) श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रलंबित असणाऱ्या उसाच्या बिलासाठी आज करमाळा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोटेगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी हरिदास मोरे यांनी पेटवून घेण्याचा केला वेळीच पोलीस व आंदोलन कर्त्याच्या मध्यस्थीमुळे सदरचा आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

श्री मोरे यांनी गेली काही दिवसांपूर्वी मकाई सहकारी साखर कारखान्याने प्रतीक उसाचे बिले द्यावेत या मागणीचे निवेदन संबंधित जिल्हाधिकारी तहसीलदार साखर आयुक्त तसेच चेअरमन मकाई सहकारी साखर कारखाना यांना निवेदन दिले होते मात्र तरीदेखील निवेदनाची कोणतीही मकाई कारखान्याने दखल न घेतल्यामुळे अखेर श्री मोरे यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात श्रीमकाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रलंबित उसाच्या मागणीसाठी आज बोंबाबोंब आंदोलन आयोजित करण्यात आले होते

यामध्ये श्री मोरे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला कित्येक दिवसापासून शेतकरी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तसेच श्री दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास जवळ यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्ते सहित वेळोवेळी तहसील कार्यालयाच्या आवारात मकाईच्या प्रलंबित उसाच्या बिलासाठी आंदोलने मोर्चे उपोषणे केली आहेत

मात्र तरीदेखील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या संबंधित चेअरमन सहित संचालक मंडळाने याची कोणतीही दखल घेतली नाही अशा या गेड्याची कातडी पांगरलेल्या मकाईच्या संचालक मंडळाला जाग कधी येणार असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकरी मधून उपस्थित केला जात आहे आज थकीत श्रीमकाई सहकारी साखर कारखान्याचे प्रलंबित दिले न दिल्यामुळे पोटेगाव येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला

तेव्हा संचालक मंडळासहित प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा भविष्यात मोठी घटना होण्याची दाट चिन्हे ऊस उत्पादक शेतकरी वर्गांमधून उमटत आहे

litsbros

Comment here