करमाळा

करमाळा तालुक्यातील वंजारवाडीच्या लेकीची UPSC मध्ये बाजी; देशात 530 वा क्रमांक पटकावला 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील वंजारवाडीच्या लेकीची UPSC मध्ये बाजी; देशात 530 वा क्रमांक पटकावला

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी बातमी आहे. आपल्या करमाळा तालुक्यातील वंजारवाडी सारख्या अतिशय छोट्या गावातील शुभांगी सुदर्शन केकाण या लेकीने UPSC मध्ये पास होऊन देशात 530 वा नंबर पटकवला आहे.

ह्या यशाने महाराष्ट्र बरोबरच आपल्या करमाळाकरांची मान उंचावली असून, शुभांगी सुदर्शन केकाण यांनी मिळवलेल्या यशाबद्दल करमाळा तालुक्यातून सर्व स्तरातून त्यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे.

शुभांगी यांचे वडील सुदर्शन केकान हे निवृत्त शिक्षक आहेत. शुभांगी यांचे शिक्षण बिडीएस झाले आहे. त्या वांजरवाडीची लेक असून करमाळा तालुक्यातीलच शेलगाव वांगी हे त्यांचे सासर आहे. पण सध्या वैद्यकीय सेवेसाठी त्या अहमदनर जिल्ह्यात स्थायिक आहेत.

litsbros

Comment here