करमाळा सोलापूर जिल्हा

करमाळा तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतिक्षा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतिक्षा

करमाळा (अलीम शेख);
पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी करमाळा तालुक्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक बजेट मात्र कोसळले आहे तालुक्यातील पोथरे बिटरगाव मांगी खडकी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने त्या ठिकाणी आशेवर पेरण्या झाल्या आहेत तर काही भागात शेतकऱ्यांनी नांगरणी मोघडणी केली तरीदेखील पाऊस नाही पाऊस न झाल्याने शेतकर्यावर दुबार पेरणीचे संकट ओडवले आहे.

त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून तालुक्यात पाऊस नसल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाला आहे सध्या तरी तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे असे भयावह चित्र सध्या दिसत आहे पावसाने तालुक्यात गेली दीड महिन्यापासून ओढ दिल्याने सध्या तरी करमाळा शहर व तालुक्यातील सर्व व्यवहार ठप्प झालेले दिसत आहे पाऊस नसल्याने करमाळा शहर तसेच तालुक्यातील किराणा व्यापारी बी बियाणे दुकाने जनरल स्टोअर व इतर सर्वच व्यवहार पूर्णपणे पाऊस नसल्याने कोलमडले आहे.

पाऊस कधी येईल या आशेवर सध्या तरी करमाळा शहर व तालुक्यातील शेतकरी वर्ग आभाळाकडे नजरा लावून आहेत मात्र गेली दीड ते दोन महिन्यापासून करमाळा शहर तसेच तालुक्यात कोठेच पावसाचा थांग पत्ता नसल्याने सध्या तरी करमाळा तालुक्यातील सर्व आर्थिक बजेट पूर्ण कोलमडले आहेत.

करमाळा शहर व तालुक्यात पाऊस नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकरी समोर उभा आहे जनावरासाठी कसलाच चारा नसल्याने शेतकऱ्यांचा जीव मात्र कासावीस झाला आहे.

शेतकऱ्यांच्या हातातून पावसाअभावी खरीप हंगाम गेल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणारा चाऱ्यावर झाल्याचे चित्र आहे

शेजारील तालुक्यात मका पिकाचे प्लॉट पुरुष विकत घेऊन त्याचा चारा म्हणून साठवणूक करण्याचे काम शेतकरी करीत आहे दुष्काळात पशुपालन करून गाय म्हशीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पूरक दूध व्यवसाय पसंती दिली आहे.

सहाजिकच साऱ्याची उपलब्धता नसल्याने आगामी काळात पाच ते सहा महिने जनावरे जाऊन संभाळण्याची कशी असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे त्यामुळे शासनाने किमान जनावरांच्या चारा पाण्याची सोय करावी अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे

पाणीटंचाईच्या सर्वाधिक झाला तालुक्यातील वाड्या वस्ती मधील ग्रामस्थांना सोसाव्या लागत आहे.

दिवसेंदिवस तालुक्यात त्यांची गावे आणि टँकरचे प्रस्ताव वाढू लागलेले या पुढील काळात प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे पाण्याची भीषण टंचाई आणि त्यातच चाऱ्यांचे गगनाला भिडलेले भाव यामुळे करमाळा परिसरातील पशुधन धोक्यात आली आहे काळजावर दगड ठेवून जिवापाड जपलेल्या गाई, गुरे म्हशीचे विक्री करण्याची वेळ पशुपालकावर आली आहे.

हेही वाचा – संजय गांधी निराधार योजनेतील अनुदानात वाढ; किती झाली वाढ? वाचा क्लिक करून सविस्तर

साहेब झालात.. सामाजिक बांधिलकी व सेवावृत्ती भाव कायम जपा, न्यायाच्या बाजूने भक्कम उभे रहा; जेऊर येथे यशवंत विद्यार्थ्यांना DYSP अजित पाटील यांचा सल्ला

बाजारात पशुधन मोठ्या प्रमाणात विक्रीस जात आहे पशुपालकाच्या मजबुरीचा गैरफायदा व्यापारी दलाल घेत आहे अल्प पर्जन्यामुळे संपूर्ण करमाळा तालुक्यात दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे.

माणसाप्रमाणे जनावरे आणि जीवांची ही होरपळ वाढली आहे पाणीटंचाईमुळे पशुपालक शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे एकदाचा मोठा पाऊस कधी पडतो याकडे मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!