करमाळा क्राइम

पती व सासूने छळ करून केला खून; गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश; २६ मे रोजी करमाळा तालुक्यातील पोफळज रेल्वे रुळाजवळ सापडला होता मृतदेह

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पती व सासूने छळ करून केला खून; गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश; २६ मे रोजी करमाळा तालुक्यातील पोफळज रेल्वे रुळाजवळ सापडला होता मृतदेह

करमाळा (प्रतिनिधी) : पती व सासूने विवाहितेचा छळ करून खून केल्याचा गुन्हा करमाळा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादीने न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

जवळा (ता. जामखेड) येथील विवाहित महिलेचा मृतदेह पोफळज (ता. करमाळा) येथील रेल्वे स्टेशनवर आढळून आला होता. संजय नरहरी बिचीतकर व सुजनाबाई नरहरी बिचीतकर (दोघेही रा. जवळा, ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर) अशी दोन संशयित आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात करमाळा पोलिसांनी कोणताही तपास न करता पुढील कार्यवाही केल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मुलीची आई गीताबाई संजय सरडे (वय ७२, रा. जवळा, ता. जामखेड) यांनी तक्रार दिली आहे. गीताबाई सरडे यांची मुलगी रुक्मिणी हिचा विवाह ३० वर्षांपूर्वी जवळा गावातील संजय बिचीतकर याच्याशी झाला होता.

वेळोवेळी आपणास सासरी त्रास होत असल्याबाबत रुक्मिणी कायम आईला सांग होती. तर पतीही गीताबाई यांना, तुमची मुली भोळसर आहे. मला सोडचिठ्ठी घ्यायची आहे, असे म्हणत असे, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

२५ मे २०२३ रोजी रुक्मिणी राहत्या घरी होती. पण २६ मे रोजी रुक्मिणीचा मृतदेह सायंकाळी सहाच्या सुमारास पोफळज (ता. करमाळा) येथे रेल्वे रुळालगत आढळून आला होता. सहायक पोलिस निरीक्षक पोपट टिळेकर तपास करीत आहेत.

 

न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

रुक्मिणीचा मृतदेह पोफळज येथे कसा आला? याबाबत कसलीही चौकशी झाली नाही. शिवाय तिच्याकडे मोबाईल नव्हता, तरीही तिच्याजवळ मुलीचा मोबाईल नंबर असलेली चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी कोणी लिहिली? रुक्मिणीला लिहिता- वाचता येत नव्हते.

शिवाय घरापासून ती पोफळजपर्यंत कशी पोचली? याबाबत कसलेही पुरावे नाहीत. तरीही या प्रकरणाची सखोल चौकशी न करता पुढील कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे फिर्यादी न्यायालयात गेली. त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!