करमाळा राजकारण सोलापूर जिल्हा

करमाळ्यात भाजपाच्या वतीने मविआ चा पुतळा जाळून,जोडे मारो निषेध आंदोलन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळ्यात भाजपाच्या वतीने मविआ चा पुतळा जाळून,जोडे मारो निषेध आंदोलन

करमाळा :- करमाळ्यात भाजपाच्या वतीने मविआ चा पुतळा जाळून,जोडे मारो निषेध आंदोलन भाजपचे
युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष शंभुराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार तसेच जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.


कंत्राटी भरती संदर्भात सर्व GR तत्कालीन मविआ सरकारने काढले होते.
असे असताना काँग्रेस,राष्ट्रवादी (शरद पवार गट),शिवसेना (उबाठा गट ) हे व यांचे बाजारू नेते कंत्राटी नोकर भरती संदर्भात भाजपा विरोधात लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत.यामुळे तरुणांमध्ये रोष पसरवण्याच काम केल संबंधितानी केले आहे.यामुळे काँग्रेस,तत्कालीन राष्ट्रवादी व शिवसेना सरकारने
कंत्राटी भरतीचे हे सर्व GR विद्यमान महायुती राज्य सरकारने रद्द केले आहेत.याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे.

या कंत्राटी भरती GR च्या संदर्भात मविआ नेत्यांनी विद्यमान राज्यातील महायुती सरकारवर बदनामी करण्याचे कटकारस्थान केले आहे.याच विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले व प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

हेही वाचा – दसरा व दिवाळीसणा निमित “मागेल त्याला ५की दाळ” योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चिवटे

लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकांना रंगेहाथ पकडले

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पै.अफसर जाधव ,तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे, जिल्हा चिटणीस विनोद महानवर,भैयाराज गोसावी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!