करमाळा तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची माजी आमदार नारायण आबा पाटील यांची मागणी

करमाळा तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची माजी आमदार नारायण आबा पाटील यांची मागणी

 करमाळा प्रतिनिधी-करमाळा तालुक्यातील मागील काही तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसाने करमाळा तालुक्यात थैमान मांडले असून यामुळे अचानक पडलेल्या या पावसामुळे तालुक्यातील द्राक्ष कांदा व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तेव्हा शासनाने त्वरित शासनाने त्वरित पंचनामे करावे व तसा आदेश देऊन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली आहे.

करमाळा तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे प्रशासनाने पंचनामे करून नुस्कान भरपाई ताबडतोब देण्यात यावी हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कृपेमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर कांदा द्राक्षे तुर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – कृषी पदवीधर युवक नागनाथची किमया; करमाळा तालुक्यातील केम मध्ये लाल चुटुक स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी!

३७ वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा महात्मा गांधी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी व मागील खरीप हंगामातील करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता परंतु उडीद तुर कांदा ही पिके वगळल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा पासून वंचित राहावे लागलेला आहे पिक विमा ताबडतोब शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी  पाटील यांनी केली आहे.

karmalamadhanews24: