करमाळा

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप; करमाळा तालुक्यात ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप; करमाळा तालुक्यात ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

जेऊर(प्रतिनिधी); शाळेत पहिल्या दिवशी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे युवासेनेकडुन गुलाबपुष्प देऊन व मिठाई वाटप करून स्वागत करण्यात आले. युवासेनाप्रुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला 

शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाबपुष्प मिठाई मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता.विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गोड झाल्याने शिक्षकांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. 

हिवरे ता.करमाळा येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत हा उपक्रम पार पडला यावेळेस युवासेना तालुका युवा अधिकारी शंभूराजे फरतडे,शाखाप्रमुख निरंजन निकम,सरपंच दत्तात्रय माळी ,उपसरपंच दिलीपभाऊ फरतडे,

मुख्याध्यापक सुग्रीव निळ, सहशिक्षक निळकंठ हनपुडे, जालिंदर हराळे, नवनाथ खरात, सुरेश शिंदे, सतिश सुर्यवंशी, पल्लवी कुलकर्णी गणेश माने उपस्थित होते.

litsbros

Comment here