करमाळा शेती - व्यापार सोलापूर जिल्हा

करमाळ्यात तुरीला उच्चांकी दर; क्लिक करून वाचा प्रतिक्विंटल किती हजार.?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळ्यात तुरीला उच्चांकी दर; क्लिक करून वाचा प्रतिक्विंटल किती हजार.?

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शुक्रवारी तुरीला उच्चांकी १०,०६६ रु . प्रतिक्विंटल दर मिळाला असून शेतकऱ्यांनी आपली तूर करमाळा बाजार समितीत विक्रीस आणावी असे आवाहन माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना माजी आ .जगताप यांनी सांगितले कि , शुक्रवारी करमाळा येथे पांढऱ्या तुरीची तब्बल २००० कट्टे आवक झाली असून १००६६ / – रू प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला असून सरासरी ९८०० / – रू . तुरीला दर मिळाला आहे .

त्याचबरोबर ज्वारीला कमाल ५४८१ / – सरासरी ४२०० / – रु . दर व हरभऱ्याला कमाल ५००१ / – सरासरी ४८५१/- दर मिळाला आहे .करमाळा बाजार समितीचा गेली ७५ वर्षापासून भुसार शेतमाल विक्रीसाठी विश्वसनीय बाजार पेठ म्हणून आसपासच्या ४ते ५ जिल्ह्यात लौकिक आहे .

हेही वाचा – आदिनाथ कारखान्यातील बेकायदेशीर भंगार मालाची विक्री निविदा रद्द करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी.

शेतकरी राजाची गोष्ट मोठ्या पडद्यावर झळकणार, टिझरला उदंड प्रतिसाद; ‘नवरदेव (Bsc Agri)’ चित्रपट २६ जानेवारीला होणार प्रदर्शित

शेतकऱ्यांसमक्ष उघड लिलाव , २४ तासात मापे व मालविक्रीची पट्टी मिळत असल्यामुळे करमाळ्यात तुर , ज्वारी , उडीद , हरभरा , मका , बाजरीची आवक मोठ्या प्रमाणात होते . चालू हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावापेक्षा जादा दर मिळत असून शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीस आणावा असे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे .

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!