करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील शेलगाव(क) येथे उद्या इतिहासतज्ञ डॉ.श्रीमंत कोकाटे यांचे उद्या व्याख्यान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील शेलगाव(क) येथे उद्या इतिहासतज्ञ डॉ.श्रीमंत कोकाटे यांचे उद्या व्याख्यान

करमाळा (प्रतिनिधी)
आपला समाज आज जाती – जातीमध्ये, धर्मा – धर्मामध्ये विभागला गेला आहे. अनेक महापुरुष जातीमध्ये वाटून घेतलेले आहेत. प्रत्येक जातीतील महापुरुषाचा रंग निळा, पिवळा, भगवा, हिरवा असा आज गडद होताना दिसत आहे. जातीय दंगली .धार्मिक दंगली ,जाती-धर्मातील वाढत चाललेली तेड या बाबी सामाजिक एकोपा धोक्यात आणणाऱ्या आहेत.

या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करण्यासाठी महानगरापासून ते छोट्याशा गावापर्यंत,वाडी – वस्तीपर्यंत वैचारिक मंथन अपेक्षित आहे.

या विचाराने प्रेरित होऊन शेलगाव क येथील सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने सर्वच महापुरुषांची जयंती एकाच व्यासपीठावरती साजरी करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला असून त्यानिमित्त डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे जागर महापुरुषांच्या विचारांचा या विषयावरती उद्या दिनांक 19 मे 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता शेलगाव क येथे व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

फुले -शाहू -आंबेडकर ही विचारधारा मानणारा हा महाराष्ट्र आहे.ही वैचारिक परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी तसेच नवीन पिढीमध्ये महापुरुषांचे विचार तसेच सामाजिक बांधिलकी निर्माण होणेसाठी असे कार्यक्रम आयोजित करणे करणे ही काळाची गरज आहे.

त्याला अनुसरूनच छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी राजे, महात्मा फुले ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,राजश्री शाहू महाराज ,अण्णा भाऊ साठे यांची एकत्रित जयंती सार्वजनिक उत्सव समितीच्या मार्फत साजरी करण्याचा निर्णय शेलगाव क येथील युवकांनी घेतला आहे.

हेही वाचा – करमाळा नगरपरिषदेवर ‘या’ मागण्यांसाठी हलगी मोर्चाचे आयोजन; करमाळा शहर विकास आघाडी आक्रमक

आर्या स्कूलची वृषाली शिंदे 98.40 गुण प्राप्त करून सोलापूर जिल्ह्यात प्रथम स्कूलच्या 19 विद्यार्थ्यांनी पटकावले 90 टक्के पेक्षा अधिक गुण सलग सातव्या वर्षी 10 वीच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम

या उपक्रमासाठी छत्रपती प्रतिष्ठान, छत्रपती शासन, छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान ,संत सावता माळी प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती या युवकांच्या मंडळांबरोबरच महिला व पुरुष यांच्या सर्व बचत गटांचे सहकार्य लाभले आहे.

litsbros

Comment here