जिल्हा परिषद शाळा नेरले येथे विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रम संपन्न

जिल्हा परिषद शाळा नेरले येथे विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रम संपन्न 

करमाळा प्रतिनिधी – सन 2024/25 या वर्षातील जि.प शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हा परिषद शाळा नेरले येथील सन 2024/25 या वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे स्त्री शिक्षणाच्या आद्यकर्त्या सावित्रीबाई फुले यांचे पूजन नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबरराजे भोसले पंचायत समिती माजी सदस्य सुनील लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे ग्रामस्थांच्या व पालक समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.

नेरले शाळेला श्री फारुक सय्यद यांची नवीन नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.वह्या पुस्तक वाटप नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच अभिमान जगताप ज्येष्ठ उत्तम पाटील शहाजी पाटील पालक समिती सदस्य गणेश गलांडे युवराज महाडिक राजेंद्र जाधव दादासाहेब बाळासाहेब नाईक श्री अनिल जगताप श्री दत्तात्रेय सुरवसे श्री आजिनाथ लोंढे दीपक लोंढे श्री बापू नाईक मुख्याध्यापक श्री जाधव शिक्षक श्री दीपक मोहोळ श्री कसबे श्री जाधव श्री मनेरी सौ आडेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी श्री औदुंबर राजे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांना शाळेसाठी कोणतीही अडचण आल्यास आम्ही दूर करू अशी आश्वासन दिले व विद्यार्थी तालुक्यात पहिला आल्यास त्या विद्यार्थ्याला व शिक्षकाला पाच हजार रुपये बक्षीस देण्याचे तसेच प्रत्येक वर्गातील पहिला दुसरा तिसरा येणारा विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा – भरगच्च कार्यक्रमांच्या आयोजनाने करमाळयात राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती संपन्न

“स्वच्छता मॉनिटरगिरी” करण्यात खातगाव नं.2 शाळा राज्यात सर्वोत्तम; मुंबईत होणार सत्कार, टॉप फिफ्टी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शाळा

त्यावेळी सुनील लोखंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून चांगले काम करण्याच्या पाठीशी असते व चुकीचे काम करणाऱ्याला शिक्षा करते,त्यामुळे तुम्ही चांगले काम करा आम्ही तुमचे पाठीशी आहोत असा विचार व्यक्त केला.कार्यक्रमास वरील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. शिक्षक श्री मनेरी यांनी सूत्रसंचालन केले व शिक्षक श्री दीपक ओहोळ यांनी सर्वांचे आभार म्हणून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line