जेऊर येथील सुवर्णकन्येचा सोलापूर येथे महिला दिनानिमित्त सन्मान
करमाळा प्रतिनिधी –सोलापूर येथील पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना सोलापूर जिल्हा सोलापूर सलग्न वसुंधरा महिला मंडळांनी जागतिक महिला दिनाचे व अनंत अडचणींवर मात करून आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी जगणाऱ्या स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले.
रेल्वे थांब्यासाठी रेलरोको; करमाळा तालुक्यातील ‘ही’ ७ गावे टाकणार लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार
समाजातील कर्तुत्वान कार्यक्षम कर्तबगार महत्वकांक्षी स्त्रिया यासाठी एक धाडसी कर्तुत्वान कार्यक्षम असणारी नारीशक्ती यशस्विनी उद्योजिका म्हणून कार्याची माहिती घेऊन एक यशस्विनी महिला उद्योजिका व सोनार समाजातील हिरा कुमारी अंकिता विष्णू वेदपाठक यांना सोलापूर येथील सौ शिल्पा ओसवाल तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व डॉक्टर सारिका देगावकर स्त्री रोग तज्ञ सोलापूर यांच्या हस्ते सन्मानपत्र व विशेष स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले.