‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक खा. शरद पवार यांच्या हाती; लेखक जगदीश ओहोळ यांनी घेतली शरद पवार यांची भेट
(प्रतिनिधी); महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, लेखक व करमाळा तालुक्यातील हिवरे गावचे सुपुत्र जगदीश अशोक ओहोळ यांनी लिहिलेले व नुकतेच प्रकाशित झालेले आणि महाराष्ट्रभर सध्या प्रचंड चर्चेत असणारे “जग बदलणारा बापमाणस” हे पुस्तक त्यांनी देशाचे नेते खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांना भेट घेऊन त्यांना दिले.
यावेळी शरद पवार यांनी पुस्तक पाहून जगदीश ओहोळ यांनी अतिशय दर्जेदार व अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे, याबद्दल समाधान व्यक्त केले. हे पुस्तक तरुणाईला, नव्या पिढीला निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे असे उद्गार त्यांनी काढले.
तसेच बाबासाहेबांच्या चरित्र विषयी व लेखनाविषयी शरद पवार साहेब यांनी जगदीश ओहोळ यांच्या सोबत चर्चा केली. बाबासाहेब, महात्मा फुले, शाहू महाराज शिवराय यांचा इतिहास नव्या पिढीने, नव्या दृष्टिकोनातून जाणून घेतला पाहिजे. लिहिला पाहिजे व जगासमोर आणला पाहिजे असे प्रतिपादन यावेळी बोलताना पवार साहेबांनी केले.
खा. सुप्रियाताई सुळे यांची ही विशेष भेट
यावेळी लेखक जगदीश ओहोळ यांनी खा. सुप्रिया ताई सुळे यांची ही भेट घेतली व त्यांना पुस्तक भेट दिले. सुप्रियाताई यांनी पुस्तक पाहून पुस्तकाचे व ओहोळ यांचे लेखनाबाबत विशेष कौतुक केले. तसेच अशा प्रकारे नवनवीन विषयांवर लिहीत राहा असे प्रोत्साहन दिले.
Add Comment