जेऊर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी; हुतात्मा व इंटरसिटी या गाड्या जेऊर येथे थांबवण्याची रेल्वे प्रवासी संघटने कडून मागणी

जेऊर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी; हुतात्मा व इंटरसिटी या गाड्या जेऊर येथे थांबवण्याची रेल्वे प्रवासी संघटने कडून मागणी

करमाळा(प्रतिनिधी); 

जेऊर स्टेशनवर दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत तेव्हा रेल्वे प्रशासनाने त्वरित जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा इंटरसिटी व उद्यान एक्सप्रेस या दोन्ही रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी जेऊर येथील रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी यांनी केली आहे आज सकाळी प्रवाश्यांकडून हैदराबाद – मुंबई एक्सप्रेस गाडीची चैन ओढण्यात आली.

हैदराबाद – मुंबई एक्सप्रेस जेऊर स्टेशन वर प्रवाशांना गाडीत चडण्यासाठी 2 मिनिटे नेहमीप्रमाणे थांबली होती व नंतर 2 मिनिटांनी हलली परंतु काही प्रवासी गर्दीमुळे चडता न आल्याने खालीच राहिल्याने आतील प्रवाशांनी चैन ओढली व गाडी थांबली, नंतर कसेबसे प्रवासी गाडी चढले.

 त्यातील काही प्रवासी जनरल तिकिटे असणारे स्लीपर कोच मध्ये चढले काही प्रवासी एसी कोच मध्ये चढले व सुमारे 10 ते 12 मिनिटांनी गाडी जेऊर स्टेशन वरून हलली. या आठ दिवसातील ही दुसरी ते तिसरी घटना अशी आहे की गर्दीमुळे प्रवाशांना गाडीमध्ये चढता आले नसून जेऊर स्थानकावर चैन ओढण्यात आली आहे, असे वारंवार प्रकार घडत आहेत.

 असे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी बोलताना म्हणाले दररोज हैदराबाद मुंबई एक्सप्रेस गाडीला व इंद्रायणी एक्सप्रेस ला प्रवाशांची गाडी मध्ये चढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे,गाडीमध्ये जागा भेटने तर लांबच, उभा राहून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे प्रवाशांचे जीवाचे हाल होत आहेत, मुंबई हैदराबाद एक्सप्रेस चे स्लीपर कोच कमी केले आहे.

 त्यामुळे 2 जनरल डब्यांवरती व 2 स्लीपर कोच वर प्रवाशांचा प्रचंड ताण येत आहे, प्रवासी वर्गातून हुतात्मा इंटरसिटी व उद्यान एक्सप्रेस या गाड्यांना जेऊर स्टेशनवर थांबा देण्याची मागणी होत आहे. येणाऱ्या काही दिवसात दिवाळीचे सणासुदीचे दिवस आहेत.

 त्या काळात जेऊर स्टेशनवर नेहमी पेक्षा प्रचंड गर्दी असते, लवकरात लवकर हुतात्मा व उद्यान एक्सप्रेस या गाड्यांना जेऊर स्थानकावर थांबा देण्यात यावा, वारंवार आम्ही रेल्वे प्रशासनाकडे निवेदन देत आहोत परंतु थांबा दिला जात नाही.

हेही वाचा – करमाळयात मस्जिद वरुन मिरवणुकीतील श्री गणरायावर पुष्पवृष्टी; हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन, वाचा सविस्तर

करमाळा शहरातील केके लाईफस्टाईल मध्ये रोजगाराची संधी; गरजूंनी संपर्क साधण्याचे आवाहन

भविष्यात जेऊर स्टेशनवर गर्दीमुळे प्रवाशांना गाडीत चढता न आल्यामुळे एखादी दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार रेल्वे प्रशासन असेल. असे शेवटी सूर्यवंशी बोलताना म्हणाले.

karmalamadhanews24: