करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
ग्रामीण भागात आठवडे बाजारात भाजीपाल्याच्या दरात तेजी
केतूर (अभय माने) करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागातील आठवडा बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने जवळजवळ सर्वच भाजीपाल्यांची दर वाढले असून लसणाच्या दरात तर प्रचंड वाढ झाली आहे तर कोथिंबिरीचे दर मात्र घसरू लागले आहेत.
वांगी 120 रुपये किलो, काकडी 50 रुपये किलो, फ्लावर 80 रुपये किलो, घेवडा 80 रुपये किलो, दोडका 80 रुपये किलो, टोमॅटो 50 रुपये किलो, हिरवी मिरची 50 रुपये किलो, मेथी पेंडी 20 रुपये, कांदा 40 रुपये किलो, लसून 250 रुपये किलो, शेवगा 80 रुपये किलो, कोंथीबीर 10 रुपयास चार पेंडी अशाप्रकारे झाले आहेत.
दरम्यान भाजीपाल्याची दर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी वाढतील अशी शक्यता भाजीपाला विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. ऊसतोड मजूर असल्यामुळे बाजारात गजबज दिसून येत आहे.
Comment here