महाराष्ट्र सांस्कृतिक सोलापूर जिल्हा

गणपती बाप्पाच्या आगमनापाठोपाठ गौराईचे आगमन;सजावटीसाठी प्लास्टिक फुले व हार,तोरणे यांची मागणी 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गणपती बाप्पाच्या आगमनापाठोपाठ गौराईचे आगमन;सजावटीसाठी प्लास्टिक फुले व हार,तोरणे यांची मागणी 

केत्तूर ( अभय माने) गणपती बाप्पाच्या आगमनापाठोपाठ गौराईचे आगमन होणार असल्याने सर्वत्र चैतन्याचे व आनंददायी वातावरण आहे. बाजारपेठा गौरी सजावटीच्या वस्तूंनी भरभरून गेलेल्या आहेत.सध्या प्लास्टिक फुले व हार,तोरणे याची चलती दिसून येत आहे.

गौराईची पावले, रांगोळी, वेगवेगळे स्टिकर्स यांना मागणी आहे. गौरी आणण्याचा मुहूर्त मंगळवार (ता.10) रोजी रात्री 8.02 पर्यंत असल्याने त्याची तयारी आजपासूनच सुरू झाली आहे त्यामुळे बाजारपेठेत महिलांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे.

हेही वाचा – जे.के फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांचा सहभाग

श्री किर्तेश्वर देवस्थान येथील श्रावण सोमवार निमित्त भव्य किर्तन महोत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न

वरचेवर सण उत्सवातील सुगंध प्लास्टिक फुलांच्या फुलांमुळे हरवल्याचे दिसून येत आहे.प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, हार, तोरणे बाजारपेठामध्ये आली आहेत. ती आकर्षकही दिसत आहेत त्यामुळे नैसर्गिक फुलांचे उत्पादन घेणारे शेतकरी अडचणीत आले आहेत प्लास्टिक फुलांचा मोठा फटका फुल उत्पादकांना बसत आहे.प्लॅस्टिकची आकर्षक रंगीबेरंगी फुले असल्याने ती ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.

यापूर्वीच्या काळामध्ये सणासुदीच्या अथवा धार्मिक कार्यक्रमात नैसर्गिक फुलांचा वापर होत होता परंतु आता हुबेहुब दिसणारी प्लास्टिकची फुले कमी किमतीत मिळत आहेत.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!