झेंडे, टोप्या, उपरणे या प्रचार साहित्याला मागणी बच्चे कंपनी खुश
केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यात जाहीर प्रचाराला सात दिवस बाकी राहिले असताना उमेदवार व कार्यकर्ते पदयात्रा, महिला पदयात्रा, प्रचार सभा, कॉर्नर बैठका, यामधून यासह जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार व कार्यकर्ते प्रयत्न करीत असताना कार्यकर्त्यांना विविध पक्षांचे झेंडे, उपकरणे, टोप्या,टी-शर्ट,यांना मागणी वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचाराला कमी कालावधी मिळाला आहे. त्यातच आता आठवडाभराचा कालावधी शिल्लक आहे.ग्रामीण भागात प्रचाराच्या तोफा धडाडत असताना कार्यकर्ते आपलाच उमेदवार कसा श्रेष्ठ हे मतदारांना पटवून देऊ लागले आहेत. उमेदवाराचे निवडणूक चिन्ह असलेले उपकणे, टोप्या टी-शर्ट,कार्यकर्त्यांना देण्यात येत असल्याने वातावरण बदलत आहे चारचाकी वाहनातून स्पीकरच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे.
हेही वाचा – दिवाळी सुट्टी संपल्याने एसटी तसेच रेल्वे स्थानकावर गर्दीचा महापूर
लाडकी बहीण लाडका भाऊ आहे मग लाडका शेतकरी का नाही ?
उमेदवाराच्या चिन्हाची चिन्ह असलेल्या आकर्षक टोप्या, उपकरणे,घेण्यासाठी प्रचारासाठी आलेली बच्चेकंपनी गडबड करीत आहेत.टोप्या व उपरणे परिधान करून ही बच्चेकंपनी सर्वत्र मिरवत असताना दिसत आहेत.