*इंग्लिश असोसिएशच्या वतीने प्रा.करे पाटील यांचा सन्मान .*
केत्तूर (अभय माने) शैक्षणिक ,सामाजिक व जलसंधारण या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल नुकताच गोवा राज्यात झालेल्या भव्य समारंभात दैनिक दिव्य मराठी एक्सलन्स पुरस्कार 2025 प्रा.करे पाटील यांना प्रदान करण्यात आल्याबद्दल सोलापुर डिस्ट्रीक्ट इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनच्या वतीने करमाळा येथे हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
प्रा. गुरुनाथ मुचंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला .
ब्रिटीश कौन्सिल इंडियाचे मेंटॉर प्रा.अशपाक काझी यांनी मार्गदर्शन केले. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की राज्य विद्या परिषदेच्या समन्वयातून शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून यासाठी विशेष समन्वय साधून सी पी डी साठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले .
विद्यमान अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड ,सचिव धनाजी राऊत, उपाध्यक्ष आगतराव भोसले, उपाध्यक्ष शशीकांत चंदनशिवे, उपाध्यक्ष आबा दाढे, अनुभवी मार्गदर्शक प्रा. भिष्मा चांदणे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर इंग्लिश टिचर्स असोसिएशनचे आधारस्तंभ आणि मुख्य सल्लागार प्रा गणेश करे पाटील यांचा सत्कार करण्यात आला . या सत्कारासाठी पंढरपूरहून अगतराव भोसले यांनी अति भव्य तुळसीहार आणला होता.सत्काराला उत्तर देताना प्रा करे पाटील म्हणाले की आगामी काळात इंग्रजी शिक्षकांना राज्यातील शिक्षण विभागाशी समन्वय साधत राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करणार असून विशेष शैक्षणिक योगदान देणाऱ्या शिक्षकांचा यशकल्याणी संस्थेच्या माध्यमातून भव्य सन्मान करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
रमजान ईद च्या निमित्ताने कुंभेज मधे दिसून येतेय सामाजिक ऐक्य – दिग्विजय बागल
विद्यमान जिल्हा अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड मार्गदर्शक प्रा. गुरुनाथ मुचंडे, ब्रिटिश कौंसिल इंडिया चे मेंटॉर प्रा अशपाक काझी ,जिल्हा सचिव धनाजी राऊत, आगतराव भोसले, शशीकांत चंदनशिवे, आबा दाढे, प्रा. भिष्मा चांदणे, किशोर शिंदे, गणेश यादव, प्रा.गोपाळकर, श्रीकांत सावंत , प्रमिला वाघमारे, महादेव पवार, समाधान अढवळकर ,असिफ तांबोळी, श्रीमंत राजेभोसले, नेताजी भोसले, प्रा. शिवाजी दांडगे, रेवनाथ आदलिंग, प्रा. जयेश पवार, प्रा. काकडे, प्रा.विष्णू शिंदे, अभियंता अतुल दाभाडे, प्रा. विठ्ठल रोडगे, शरद शिंदे,दत्तात्रय मोहोळकर, प्रसिद्धी प्रमुख सुखदेव गिलविले, सचिव गोपाळराव पाटील, सहसचिव मारूती जाधव, श्रीराम शिंगटे, सुहास गलांडे, विजय गरड, आप्पासाहेब वाघमोडे , प्रा.डोके, प्रा. कुंभार, संदीप तेलंग बाळासाहेब सलगर आदी उपस्थित होते . प्रा.कल्याणराव साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले.