जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार वाशिंबे येथील शरदचंद्रजी पवार विद्यालयास प्राप्त
वाशिंबे (सचिन भोईटे):- सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार 2023 हा वाशिंबे येथील शरदचंद्रजी पवार विद्यालयास आमदार जयंत आसगांवकर,पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ याच्या अध्यक्षेत व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ,व मा.संपत सूर्यवंशी शिक्षण संचालक,महारष्ट राज्य,पुणे यांच्या शुभहस्ते हुतात्मा स्मृती मंदिर,सोलापूर येथे देण्यात आला आहे.
समाजातील अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश निर्माण करण्यासाठी आपल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेची उभारणी केली. भेगाळून तप्त झालेल्या धरतीला मायेच्या पावसाची गरज असते, त्याप्रमाणे संस्थेने आईच्या ममतेचे आपल्यासारखे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षर्केतर कर्मचारी नियुक्त केले. संस्थेचे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून, ध्येय गाठण्यासाठी आपण सर्वांनी अविरत परिश्रम व त्यामध्ये सातत्य ठेवून प्रशाला नावरुपाला आणली. शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच कला क्रीडा संस्कृती व सामाजिक उपक्रमातही आपल्या प्रशासनाने जो दाखवण्याजोगे यश मिळवले आहे.
विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करताना जमिनीवर पाय घट्ट होऊन आकाशात नजर लावून स्वप्नांची नक्षत्र पाहण्याची ताकद तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली. म्हणून आपण सर्वजण व आपली प्रशाला आदर्शवत असल्यामुळे आपल्या शाळेला जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.असे गौरव उद्गारत मान्यवरांच्या हस्ते सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने वाशिंबेतील शरदचंद्रजी पवार विद्यालयास हा बहुमान मिळाला आहे.हा पुरस्कार स्विकारताना मुख्यध्यापक रमेश यादव,सहशिक्षक हरी शिंदे सर,सर्व शिक्षक,कर्मचारीवर्ग आदी उपस्थित होते.
Comment here