दिर्घकाळ द्वेषाचे राजकारण चालणे हे समाज हिताचे नाही: तालुक्यात होतेय चर्चा
केत्तूर ( अभय माने) सध्या सुरू असलेल्या राज्यातील राजकारणात प्रतीस्पर्धाला स्पर्धक न मानता शत्रू मानले जात आहे. राजकारणातील खिलाडूवृत्ती वरचेवर संपत आहे.मतभेदाचे रूपांतर मनभेदात होत आहे त्यातून सुरू असलेले दीर्घव्देशाचे राजकारण समाजहिताचे नाही. अशी चर्चा गावागावातून सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सुरुवातीला शिवसेनेचे दोन गट झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन गट झाले. लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यामुळे राजकीय स्पर्धा मात्र वाढली आहे.
त्यातूनच खालच्या पातळीवरची बोचरी टीका एकमेकांवर केली जात आहे.